Home आरोग्य तूळशीचे दुष्परिणाम ही

तूळशीचे दुष्परिणाम ही

244
0

तुळस हि हिंदू धर्मत पवित्र व आरोग्यदायी मानली जाते. तुळशीच धार्मिक महत्त्व आणि आरोग्याचे फायदे याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही ते अनेकदा वाचलही असेल, पण तुळश खाण्यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? रोज तुळस खाल्ल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. आहारतज्ज्ञ म्हणतात की तुळस खाणं चांगलंच आहे पण त्यानेही दुष्परिणाम होऊ शकतात.तुळशीत असलेल्या संयुगामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. म्हणून गर्भवती महिलांनी तुळस कमी खावी असा सल्ला दिला जातो. शक्य असेल तर खाऊच नये.तुळशीचे जास्त सेवन केल्याने यकृत खराब होते, हृदयाचे ठोके वाढू शकतात किंवा इतरही हृदयाचे आजार होऊ शकतात.तुळशीमुळे रक्तातली साखर कमी व्हायला मदत होत. जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषध घेत असाल तर तुळस खाऊ नका; कारण यामुळे तुमच्या रक्तातली साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते.दररोज जास्त प्रमाणात तुळशीचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे जुलाब, मळमळ यासारख्या समस्यांना सामोर जावे लागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here