Home महाराष्ट्र अमृता पवार यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

अमृता पवार यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

394
0

जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात दहा हजाराहून अधिक मताधिक्याचा विक्रम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता पवार मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. पवार यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षामधून भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. मालेगाव येथील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.
आता नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमधून नाशिकला चांगले बळ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगला डाव खेळल्याचे दिसून येत आहे.

कोण आहेत अमृता पवार ?,
खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, माजी खा. स्वर्गीय वसंतराव पवार व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक च्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या अमृता पवार आहेत. पेशाने त्या अर्केटेक्चर आहेत. गेल्या तीन निवडणुकांत नेहेमीच संभाव्य उमेदवार मविप्र`च्या माजी सरचिटणीस निलीमाताई पवार होत्या.आता त्या सक्रीय राजकारणापासून लांब आहेत. मात्र त्यांच्या कन्या आर्कीटेक्ट अमृता पवार जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांना माजी खासदार (कै) डॉ. वसंतराव पवार यांचा वारसा आहे. त्या भाजपच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार ठरू शकतात. विरोधक म्हणून राजकारणात श्री. भुजबळ यांनी पवार कुटुंबाला नेहेमीच पाण्यात पाहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here