Home बीड आष्टी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा!

आष्टी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा!

795
0

आष्टी। आष्टी शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ही जनावरे रात्री पिकांवर ताव मारत असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. या जनावरांनी ५० हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की आष्टी शहरातील आजुबाजुच्या शेतामधील अतिशय उत्कृष्ठ आलेले पिक ज्या मध्ये ज्वारी , हरभरा , गहू , तूर , कांदा , कापूस हे सर्व पिक अंदाजे ५० हेक्टर क्षेत्रावरील मोकाट फिरणा – या जनावरांनी संपूर्ण खाल्ले असून या मध्ये शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.संपूर्ण शेतकरी या मोकार सोडलेल्या जनावरांच्या त्रासाला वैतागून गेले आहेत.आपण कडे लक्ष घालून या मोकाट फिरणा-या जनावरांना गो – शाळेमध्ये सोडण्यात यावे या जनावरांचे मालक यांना नुकसान भरपाई ची मागणी करावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.या निवेदनावरती २६ शेतक-यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here