Home औरंगाबाद जी-20 च्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी पाहुण्यांचे आगमन : वेरूळमध्ये 450 पोलिस, तीन...

जी-20 च्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी पाहुण्यांचे आगमन : वेरूळमध्ये 450 पोलिस, तीन श्वानपथके तैनात

453
0

वेरूळ:जगप्रसिद्ध वेरूळ पर्यटनस्थळी जी-२० चे सदस्य २८ फेब्रुवारीला भेट देणार आहेत. या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे, काही विभागांची तयारी अंतिम टप्यात आहे. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात व अपर पाेलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक विशाल नेहुल, उपअधीक्षक जयदत्त भवर, उपअधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक विजय मराठे यांच्यासह खुलताबादचे पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तगडा पोलिस बंदोबस्त लावण्याबाबत नियाेजन करण्यात आले. बंदोबस्तमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची शुक्रवारी वेरूळ येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रमातील संस्कार भवनात नियाेजन बैठक घेतली. या वेळी बंदाेबस्ताच्या नियाेजनाबाबत चर्चा करून सुरक्षेसंदर्भात सूचना दिल्या, तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याआधी वेरूळ लेणी ते नवीन सोलापूर-धुळे महामार्गापर्यंत दुतर्फा ५० ते ३० फुटांपर्यंत अतिक्रमण काढण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासह घाटातील रस्त्याकडील भिंत उभारण्यासह विविध कामे करण्यात आली आहेत.ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या उपस्थितीत उपअधीक्षक विशाल नेहुल, उपअधीक्षक जयदत्त भवर, उपअधीक्षक मुकुंद आघाव, उपाधीक्षक डॉ. विजयकुमार मराठे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक ४, पोलिस निरीक्षक ७, पोलिस उपनिरीक्षक ३०, पुरुष पोलिस अंमलदार ३७०, महिला पोलिस अंमलदार ४०, बॉम्बशोधक व नाशक आणि ३ श्वानपथके असा बंदोबस्त केला आहे . जी-२० मधील मान्यवर पाहुणे हे मंगळवारी दुपारी २:३० वाजता मोठ्या बंदोबस्तात वेरूळ येथील लेण्याना भेट देणार आहे . यानंतर ६:३० वाजेपर्यंत ते लेणी पाहतील. यानंतर ते वेरूळ पर्यटक केंद्रामध्ये येतील व याठिकाणी भोजन करून येथे हाेणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती लावतील. यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे मुक्कामासाठी रवाना हाेतील.जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वेरूळ लेणीत पुरातत्त्व विभागांतर्गत तीन शुद्ध पाण्याचे फिल्टर बसवण्यात आले आहे . शौचालये, पथरस्त्याची दुरुस्ती, साइन बोर्ड, लोकेशन बोर्ड, लेणी नंबर बोर्ड, लेणीअंतर्गत डांबरीकरण, लेणीविषयी माहिती देणारे मराठी फलक, स्ट्रीट लाइफ, बॅटरी बसस्थानकसह विविध कामे करण्यात आली आहे तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here