Home अहमदनगर शिर्डी संस्थांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल आ. आशुतोष काळेंचा कोपरगाव व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार

शिर्डी संस्थांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल आ. आशुतोष काळेंचा कोपरगाव व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार

19675
0

कोपरगाव : कोपरगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असून शहरातील पाणी, रहदारी, पार्किंग, अतिक्रमण या सारख्या अनेक समस्यांनी शहरवासी पुरते हैराण झाले असून त्यामुळे कोपरगाव ची बाजारपेठ अतिशय अडचणींचा सामना करत आहे. या समस्यांचा पाढा कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांच्यासमोर वाचला. तसेच या समस्या केवळ आपणच दूर करू शकता असा आशावादही व्यक्त केला. त्यावर आ. काळेंनी आपण या सर्व समस्यांची सोडवणूक करू तसेच पाच नंबर तळ्याचे काम मार्गी लागले आहेत. शहरातील २८ रस्त्या संबंधीची कामे देखील मार्गी लागतील असे आश्वासन दिले.
आमदार आशुतोष काळे यांची श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत मिळवून दिल्याबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन यांचे माध्यमातून आमदार काळे यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी वरील समस्यांचा पाढा व्यापारी महासंघाने वाचला. वैजापूर, येवला, संगमनेर येथील बाजारपेठा ज्याप्रमाणे भरभराटीस आल्या त्या मानाने कोपरगाव खूप मागे आहे असेही यावेळी व्यक्त केले.
कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत मिळवून दिली तसेच शिर्डी संस्थान च्या अध्यक्षपदी झालेली निवड आणि आमदारकीची दोन वर्षात कोपरगाव मतदारसंघातील झपाट्याने केलेली विकास कामे या सर्वांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी काल कोपरगाव शहरातून आमदार काळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलाल व फुलांची उधळण करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यानंतर समता पतसंस्थेच्या हॉलमध्ये आमदार काळे यांच्या हस्ते अति तत्पर सोनेतारण कक्ष व कस्टमर केअर सेंटर चे उद्घाटन करण्यात आले. या सत्कार प्रसंगी सुधीर डागा, केशव भवर, अजित लोहाडे, व ओम प्रकाश कोयटे यांनी कोपरगाव शहरातील विविध समस्यांवर आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, विधानसभेच्या अटीतटीच्या लढतीत जो विजय झाला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात आपण १२ कोटीचा निधी नगरपालिकेला आणून दिला आहे. अजूनही निधी आणून देण्यास आपण वचनबद्ध आहोत. या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागतील. आपण या सर्व समस्यांची सोडवणूक करू तसेच पाच नंबर तळ्याचे काम मार्गी लागले आहेत. शहरातील २८ रस्त्या संबंधीची कामे देखील मार्गी लागतील. सरकारचे कोविड काळात उत्पन्न घटले तरीसुद्धा खूप कामे सरकारने केलेली आहेत असेही शेवटी ते म्हणाले. सत्कारा बद्दल आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, रमेश गवळी, मंदार पहाडे, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच तुलसीदास खुबाणी, कृष्णा उदावंत, गोपी लोंगाणी, किरण शिरोडे, महिला आघाडीच्या किरण दगडे, किरण डागा आदी सह कोपरगाव शहरातील व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार बंब यांनी तर सूत्रसंचालन प्रदिप साखरे यांनी केले. गुलशन होडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here