Home मनोरंजन कलाकार असण्याची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे……

कलाकार असण्याची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे……

558
0

अभिनेत्री कंगना रनौत चे वादग्रस्त ट्विट

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असते. आता तिने परत एक वादग्रस्त ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. आता कंगनाने एक ट्वीट करत तिला कलाकर म्हणून काम करताना कशाची भीती वाटते ते सांगितले आहे.“घराणेशाही आणि मुव्ही माफीया यांच्या व्यतिरिक्त कलाकार असण्याची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नाइट शिफ्टमध्ये काम करणे आहे. जेव्हा सुर्योदय होतो तेव्हा आपण झोपतो त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात. सुरूवातीला रात्री काही दिवस मला भूक लागत नव्हती आणि मन सारखे विचलीत होत होते. आता माझ्या शरीराला याची सवय होईल याचीच वाट बघते” अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

दरम्यान कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here