Home क्रीडा टीम इंडियामधून बाहेर असलेल्या खेळाडूने केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

टीम इंडियामधून बाहेर असलेल्या खेळाडूने केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

552
0

टीम इंडियामधून बाहेर असलेल्या खेळाडूने IPL मध्ये ‘रनमशीन’ विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २०२३ इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. पंजाब किंग्सच्या संघातील एका खेळाडूने पहिल्या सामन्यातील निराशा बाजूला करुन स्पर्धेत पाहिलं अर्धशतक ठोकलं. या खेळाडूने संघासाठी ५६ चेंडूमध्ये नाबाद ८६ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा दिला. या खेळाडूच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने मोठा स्कोर उभा केला.

आयपीएल २०२३ मध्ये गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना झाला. संघाच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकत आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध तुफान कामगिरी केली आणि ८६ धावा करत त्यात ९ चौकार व तीन षटकार खेचले. पंजाबने २० शतकात ४ बाद १९७ धावांचा मोठा स्कोर उभा केला. आणि शानदार गोलंदाजीच्या बळावर राजष्ठांविरुद्ध फक्त पाच धावांनी सामना खिशात घातला.

गुवाहाटीमध्ये अर्धशतकी खेळी करत धवनने आयपीएलमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. या सामन्याआधी केवळ दोन फलंदाजांनी आयपीएल इतिहासात अर्धशतक किंवा त्याहून अधिक स्कोर केला आहे. आता या लिस्टमध्ये धवनदेखील सामिल झाला आहे. डेविड वॉर्नर (६०) आणि विराट कोहली (५०) नंतर धवन अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

धवनने राजस्थानविरुद्ध आपली सुरुवात संथ केली. पॉवरप्लेमध्ये १३ चेंडूमध्ये त्याने केवळ १४ धावा केल्या. यादरम्यान प्रभसिमरन सिंहने आक्रमक बॅटिंग केली. प्रभसिमरन आणि भानुका राजपक्षे दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे पंजाबच्या कर्णधाराने गिअर बदलला आणि अर्धशतकी खेळी केली.धवनने ३६ चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, तर त्यानंतर २० चेंडूवर ३६ धावा केल्या. पंजाबने १९७ धावा केल्या, तर राजस्थानने १९२ धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here