Home अपघात बातमी पुण्यात महिलेसह दोन चिमुकल्यांना ठार मारून जाळलं

पुण्यात महिलेसह दोन चिमुकल्यांना ठार मारून जाळलं

337
0

पुणे: महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून त्यांचा खून करून तिघांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे, बेडशीट, लाकडे यांच्या साह्याने मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढव्यात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा महिलेचा पुतण्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळता कोंढवा पोलिसानी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील पिसोळी परिसरात हा प्रकार घडला. मारेकरी हा महिलेचा दीर होता. या प्रकरणी वैभव रूपसेन वाघमारे ( वय ३०, मूळ राहणार लोहोटा तालुका, औसा जिल्हा लातूर), असे आरोपीचे नाव आहे. तर महिला आम्रपाली वाघमारे ( वय २५ रा पिसोली कोंढवा) मुलगी रोशनी (वय ६ ) मुलगा आदित्य ( वय ४ ) असे मृत झालेले व्यक्तींची नावे आहेत. याबाबत समीर साहेबराव मसाला याने फिर्याद कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव हा महिलेचा दीर आहे. महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने आरोपी वैभव याने दोन दिवसांपूर्वीच तिघांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिघांचे मृतदेह एका पत्र्याच्या खोलीत जाळत होता. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळाली.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुलत दीर व आम्रपाली हे मूळचे लातूरचे आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी दोघे पुण्यात पळून आले होते. आम्रपाली यांचा विवाह झालेला होता. पण प्रेमकरणामुळे त्या चुलत दिरासोबत येथे पळून आलेल्या होत्या. कोंढवा येथील पिसोळी येथील फिर्यादी मासाळ यांच्या शेतातील खोलीत दोन मुलं, आम्रपाली आणि चुलत दीर वैभव असे राहत होते. वैभव याला आम्रपालीचे दुसऱ्याशी संबंध आहेत असा संशय होता. त्यावरून ही घटना घडली आहे.दरम्यान रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने प्रथम आम्रपाली यांना ठार मारले. त्यानंतर दोन्ही मुलं रडत असल्याने त्यांचा गळा दाबून संपवले, आणि नंतर तिघांना घराच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये नेऊन, घरातील कपडे व लाकडे गोळा केली आणि तिघांना जाळून टाकले. हा प्रकार समोर येताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंढवा पोलीस आणि तात्काळ पळून गेलेल्या चुलत दिराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here