Home देश-विदेश भारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते...

भारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते वजन !

6625
0

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवत आहे. त्यामुळे तो अधिकच घातक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे नवे व्हेरियंट्स समोर येत आहेत. आता याचा आणखी एक घातक व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. हा एवढा घातक आहे की, यामुळे अवघ्या सात दिवसांतच रुग्णाचे वजन कमी होते. सर्वात आधी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये आढळून आला होता. तिथूनच हा व्हेरियंट भारतात आल्याचे समोर येत आहे. दरम्यान, आता वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलमधून कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट भारतात आले. दुसऱ्या व्हेरियंटचे नाव बी.1.1.28.2 आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैज्ञानिकांनी या व्हेरियंट्सचे परीक्षण एका उंदरावर केले होते. याचे अनेक धक्कादायक परिणाम समोर आले होते. त्यात बाधित झाल्यानंतर लगेचच सात दिवसांच्या आत याची ओळख पटवली जाऊ शकते. हे एवढे घातक आहे की, या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीराचे वजन 7 दिवसांच्या आत कमी होते. त्याचसोबत डेल्टा व्हेरियंटप्रमाणे हे देखील अँटिबॉडीची क्षमता कमी करु शकते. पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.1.1.28.2 व्हेरियंट विदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळून आला होता. या व्हेरियंटच्या जीनोम सीक्वेसिंग करण्यात आले आहे, त्यानंतर परीक्षण करण्यात आले. सध्या भारतात या व्हेरियंटचे फारसे रुग्ण नाहीत. विदेशातून परतलेल्या दोन व्यक्तींच्या सॅम्पल्सची सिक्वेसिंग करण्यात आली होती. कोरोनातून रिकव्हर होईपर्यंत दोन्ही व्यक्तींमध्ये याची लक्षणे नव्हती. परंतु, यांच्या सॅम्पल्सचे सीक्वेसिंग केल्यानंतर बी.1.1.28.2 व्हेरियंटची माहिती मिळाली. एका उंदरावर या व्हेरियंटचे परीक्षण केले गेले. या परीक्षणात तीन उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतमध्ये संसर्ग वाढल्यामुळे झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here