Home क्रीडा लिओनेल मेस्सीने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब

लिओनेल मेस्सीने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब

289
0

अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा स्टार आणि अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पॅरिसमध्ये २०२२ सालचा फिफा प्लेयर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला आहे. महिला गटात सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार स्पॅनिश खेळाडू अलेक्सिया पुटेलसला देण्यात आला.मोठया प्रतीक्षेनंतर लिओनेल मेस्सीने पहिला फिफा विश्वचषक जिंकला आहे.ज्याचे आयोजन कतारमध्ये करण्यात आले होते. फ्रान्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सीने दोन महत्त्वाचे गोल केले होते. अंतिम सामना जिंकून अर्जेंटिनाने तब्बल३६वर्षांनंतर विश्वचषकाची सुवर्ण ट्रॉफी जिंकली. लिओनेल मेस्सी व्यतिरिक्त अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारे त्याचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांची फिफाच्या २०२२ वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी निवड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा कीपर एसी मार्टिनेझने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यासाठी त्याला FIFA गोलकीपर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.लिओनेल मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. यासह त्याने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, ज्यांनी दोनदा कब्जा केला. पीएसजी क्लबकडून खेळणाऱ्या मेस्सीला यापूर्वी २०१९ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.रोनाल्डोने २०१६ आणि २०१७ मध्ये सलग दोन वर्षे हा पुरस्कार जिंकला. तर लेवांडोव्स्कीने २०२० आणि २०२१ मध्ये ते ताब्यात घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here