Home बीड पात्रुड परिसरात अवैद्य वाहतूक जोमात ! पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पात्रुड परिसरात अवैद्य वाहतूक जोमात ! पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पात्रुड येथून मार्गस्थ होणाऱ्या महामार्गावरून अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन वर्दळ वाढली आहे. परिसरातील अटो चालकांची अवैद्य प्रवासाची जनू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. सुचालकांच्या मनमानीमुळे महामार्गावर तासंतास लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. सततच्या वाहतुक कोंडीचा सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असला तरी पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहे

572
0

मराठवाडा साथी न्यूज

माजलगाव: तालूक्यातून मार्गस्थ होणाऱ्या महामार्गालगत वसलेल्या पात्रुड गावची लोकसंख्या जेमतेम असल्याने गावातून शहरात ये-जा करणाऱ्या नागरीकांची संख्याही त्याच तुलनेत आहे. कामानिमीत्त शहरात ये- करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बस संख्या तोकडी आहे.

हक्काचे वाहन नसल्याने नेहमीच खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. त्याचाच गैरफायदा घेवून महार्गावर सर्रास अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या मनमानीला नागरीकांना सामोर जाव लागत आहे. अटो चालक कोणालाही न जूमानता महार्गावर आडवी वाहनं लावून सर्रास मार्गावरील वाहतूक खोळंबून ठेवतात. त्यामुळे माहामार्गावरील लांबच लांब रांगा लागत आहेत.

याशिवाय शहराकडे प्रवाशी भरून  नेण्यासाठी एकमेकात चढाओढ करणाऱ्या अटो चालकांमध्ये होणाऱ्या किरकोळ बाचाबाचीत चक्क महमार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार आनेक वेळा घडत आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे पोलिस प्रशासन मात्र जानिवपूर्वक डोळेझाक करत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.

एस टी बसच्या वाहतूकीला खोळंबा होत असल्याने महिला,बालक, वृद्धनागरीकांना बसमध्ये चढउतार  करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील अवैद्य प्रवासी वाहतूकीकडे पोलिसांनी मात्र पुरती डोळेझाक केल्याने खासगी वाहन चालकांची मनमानी फोपावत आहे. गावातील व्यवसायीक, व्यापाऱ्यांनी आनेकवेळा अवैद्य वाहतूकीच्या तक्रारी दिल्या मात्र, निरगठ्ठ प्रशासनाला जाग आली नाही.

वाहतूकीचे नियम धाब्यारवर बसवून सर्रास अवैद्य वाहतूक करणारी अटो चालक व्यापारी गाळ्यासमोर वाहने आडवी लाऊन हूज्जत घालतात. तासंतास अटो गाळ्यासमोरील अटो काढण्याची विनंती करणाऱ्या व्यापाऱ्याना नेहमीच त्यांच्या उद्धट भाषा ऐकावी लागते.  बसस्थानका अभावी महामार्गावरील बेसीस्त वाहतूकीला आवर घालणे कठीन असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सुविधां अभावी नागरीकांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

राष्ट्रीय महार्गालगत  असलेल्या पात्रुड गावाशी परिसरातील गावखेड्यांसह वाडी-तांड्यांचा संपर्क जोडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, वास्तविक पाहता या ठिकाणी बसस्थानकाची आवश्यकता असून मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बसस्थानक, निवाऱ्याअभावी प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत वाहनाची वाटप पाहत उभे राहावे लागते. त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.  

गावशिवारातून मार्गस्थ होणाऱ्या खामगाव- पंढरपूर महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवतीला फार मोठ्या  प्रमाणात धोका निर्माण आहे. त्यातच शुक्रवारी जनावरांसह आठवडी बाजारासाठी परीसरातील 25ते 30 गावखेड्यांचे नागरीक बाजारासासठी पात्रुड येतात त्यामुळे नेहमीच जत्राचे स्वरूप आलेले असते. याचाच गैरफायदा घेवऊन अवैद्य प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक प्रवाशांची लूट करीत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here