Home लाइफस्टाइल तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा….!

तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा….!

2053
0

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) चुकीचा उल्लेख झाल्यानं सगळीकडे चर्चा सुरू आहे. चुकीचा शब्द वापरला गेल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
भाजपाच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द वापरण्यात आला असल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चाही सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याची दखल घेत कारवाईचा इशारा दिला. मात्र, गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here