Home Uncategorized रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक

रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक

13
0

करोना संकटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे तसंच बैठका सुरु आहेत. मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं होतं –
“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here