Home इतर बंगालमध्येही निवडणूक लढविण्याचा विचार

बंगालमध्येही निवडणूक लढविण्याचा विचार

256
0

मराठवाडा साथी न्यूज

नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएनं बाजी मापली असली तरी या निवडणुकांमध्ये अनेक बदलही पाहालया मिळाले. बिहारमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनं मुसंडी घेत पाच जागांवर विजय मिळवला. दरम्यान, बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली. ओवेसी यांनी एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केलं.

“पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागांचं आमचं डिपॉझिटही जप्त झाले होते. आमच्या सहाच्या सहा जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिलं. जनतेनं आम्हाला मतदान केलं आणि प्रेम दिलं. आम्हाला पुढे अजूनही मेहनत करायची आहे,” असं ओवेसी म्हणाले. “आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत. आमच्या अनेक नेत्यांना खोट्या आरोपाखाली टीएमसीनं तुरूंगात टाकलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आम्ही लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू. पश्चिम बंगालचा निर्णय अद्याप बाकी आहे. निर्णयापूर्वी आम्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा करू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here