Home महाराष्ट्र लवकरच सर्वांसाठी लोकल सुरु होणार : विजय वडेट्टीवार

लवकरच सर्वांसाठी लोकल सुरु होणार : विजय वडेट्टीवार

10
0

मुंबई : सध्या मुंबई लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रवाशांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकल सुरु होणार असल्याचे संकेत दिले आहेत.कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसह इतर काही लोकांनाच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. आता सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असे ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here