Home अहमदनगर “सोमैय्या”च्या योगेंद्र व आदितीने पटकावला राज्यस्तरीय वादविवाद करंडक

“सोमैय्या”च्या योगेंद्र व आदितीने पटकावला राज्यस्तरीय वादविवाद करंडक

28255
0

कोपरगाव : कोपरगाव येथील के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी योगेन्द्र मुळे व कु.आदिती देशमुख यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी खुर्द येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सांघिक फिरता रौप्य करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये 2100/- तसेच योगेंद्र मुळे याने रुपये 5001/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे वैयक्तिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, वादविवाद मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. गणेश देशमुख आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here