Home मुंबई खळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका

खळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका

10855
0

मुंबईच्या किनाऱ्यांवर समुद्र रोद्ररूप धारण करून होता. उंचउंच लाट किनाऱ्यावर धडकत होत्या. गेट वे ऑफ इंडिया जवळची व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत.

मुंबई / प्रमोद अडसुळे :

तौते चक्रीवादळ गुजरातच्या सीमेवर धडकले आहे. हे चक्रीवादळ सोमवारी मुंबईजवळच्या अरबी समुद्रात होते. त्यामुळे समुद्र चांगलाच खवळला होता. सरासरी ताशी शंभर किमी वेगवान वारे आणि पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजवला होता. मुंबईच्या किनाऱ्यांवर समुद्र रोद्ररूप धारण करून होता. उंचउंच लाट किनाऱ्यावर धडकत होत्या. गेट वे ऑफ इंडिया जवळची व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत.

रविवारी कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईसह परिसराला चांगलाच तडाखा दिला. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उमलून पडली. जीवनवाहिनी लोकल रेल्वे, मोनो रेल आणि हवाई वाहतूक सुद्धा बंद होती. मुंबईच्या किनाऱ्यांवर लाटांच्या धडका सुरूच होत्या. मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाजवळची परिस्थिती चक्रीवादळाच्या काळात भयंकर दिसून आली.

गेट वे ऑफ इंडिया जवळचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ गेट वे ऑफ इंडियाजवळील ताज हॉटेलमधून घेण्यात आले आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात रौद्ररूप धारण केलेला महाकाय समुद्रातील लाटा गेट वे ऑफ इंडियापर्यंत धडका देत होत्या. अरबी समुद्र चांगलाच खवळलेला दिसत आहे. प्रचंड वेगवान वाहणारा वारा आणि खवळलेल्या समुद्राचं दृश्य पाहून अंगावर शहारे येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here