Home शहरं मतदार कार्डही होणार डिजिटल…?

मतदार कार्डही होणार डिजिटल…?

582
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.आता आपले मतदार कार्ड सुद्धा आधार कार्ड प्रमाणे डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. याचा अर्थ आता मतदार आता डिजिटल स्वरूपात आपले मतदार ओळखपत्र आपल्या जवळ ठेऊ शकतील.पण डिजिटल कार्ड जरी आले तरी सध्याचे फिजिकल कार्ड सुद्धा मतदारांकडेच असेल. हि सुविधा प्राप्त करण्यासाठी मतदार कार्डधारकांना मतदार हेल्पलाइनअ‍ॅपद्वारे KYC करावी लागेल,तरच हि सुविधा प्राप्त करता येईल. यामार्फत इलेक्टर्स फोटो आइडेंटिटी कार्डची सुविधा सहजपणे उपलब्ध करून देणे हे निवडणूक आयोगाचे उद्दीष्ट आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नवीन मतदार इंटरनेटवरून आपले मतदार कार्ड डाउनलोड करू शकतात.फक्त एव्हडेच नाही तर हे निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये नोंदवलेल्या सर्विस वोटर्ससाठीही फायदेशीर ठरेल. या निर्णयानंतर सर्विस वोटर्स डिजिटल स्वरूपात EPIC डाउनलोड करू शकतील.

परदेशात राहणाऱ्या मतदारांनाही मिळणार सुविधा

आयोगाने घेतलेल्या या निर्णयानंतर परदेशात राहणारे मतदारदेखील या डिजिटल मतदार कार्ड सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मात्र,परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाची सुविधा देण्यात आलेली नाही.पण जर कोणी परदेसी मतदार एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेला आणि त्याला नवीन जागेचा मतदार व्हायचे असेल तर आवश्यक त्या प्रक्रियेचा अवलंब करुन त्याला या सुविधेद्वारे एखादे नवीन मतदार कार्ड डाउनलोड करता येईल.

नवीन कार्डासाठी अर्ज केलेल्यांना मिळू शकते डिजिटल कार्ड

जर मतदाराकडून फिजिकल कार्ड हरवले असेल आणि नवीन कार्डसाठी अर्ज केला असेल आणि त्याला मान्यता मिळाली असेल तर मतदार स्वतःचे डिजिटल कार्ड डाउनलोड करू शकेल. डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड (QR) असतील. या कोडवरील माहितीच्या आधारे, इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या मतदार कार्डद्वारे मतदार मतदान करू शकतील. यामध्ये, क्यूआर कोडमध्ये मतदारांचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग आणि मतदारांच्या फोटोशी संबंधित माहिती असेल. येणाऱ्या वर्षी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना ही सुविधा उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here