Home क्राइम एकतर्फी प्रेमाने घेतला इतक्यांचा जीव…!

एकतर्फी प्रेमाने घेतला इतक्यांचा जीव…!

769
0

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक असू शकते आणि त्याचे परिणाम कसे असू शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या आजी आणि भावाचा जीव घेतला.लक्ष्मीबाई धुर्वे(वय ६५) आणि यश धुर्वे(वय १०)च्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा आरोपी अल्पवयीन असून त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण

सुमारे दीड वर्षापूर्वी इंस्टाग्राम वर एकमेकांचे फोटो पाहून तरुण आणि तरुणीची ओळख झाली.त्यानंतर काहीदिवसांनी त्यांच्या या मैत्रीची माहिती कुटुंबियांना तिच्या मोबाईल द्वारे मिळाली.तिच्या घरच्यांनी तिचा मोबाईल काढून घेत त्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटून माहिती त्यांनाही दिली. कुटुंबियांनी समजूत घातल्यानंतर तरुणी त्याला टाळू लागली. तरी तो तरुण नागपूरच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या तरुणीच्या कृष्णगर भागात यायचा. तरुणीच्या कुटुंबियांशी वाद घालायचा.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो माथेफिरू भेटण्यासाठी तरुणीवर दबाव आणत अस तिला मारहाण ही करत.घटनेच्या १५ दिवसांपूर्वी सुद्धा त्याने तरुणीला मारहाण केली होती. तेव्हा धुर्वे कुटुंबातील काही कौटुंबिक मित्रांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरुणी मारहाणीनंतर एवढी जास्त घाबरलेली होती की तिची अवस्था पाहून तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला होता.

तरुणीच्या आजीचा आणि भावाचा खून करून त्याने केली आत्महत्या

काल दुपारी सर्वजण आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असताही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री ९ वाजून २६ मि. जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन त्याने स्वतःचा जीव संपवला.त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here