Home शहरं केंद्र सरकारचा निर्णय ; तब्बल ४३ अ‍ॅप्सवर बंदी…!

केंद्र सरकारचा निर्णय ; तब्बल ४३ अ‍ॅप्सवर बंदी…!

220
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी डिजिटल स्ट्राईक केली आहे. यामध्ये आता भारतातील तब्बल ४३ अ‍ॅपला ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी अ‍ॅक्ट ६९ ए अंतर्गत सर्व ४३ अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारने ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे त्यात अली सप्लायर्स मोबाईल अ‍ॅप, अलिबाबा वर्कबेंच, अली एक्सप्रेस, अलिपा कॅशिअर, लालामूव इंडिया, ड्राईव्ह विथ लालामोव इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड-बिझिनेस कार्ड रीडर, कॅम कार्ड- बीसीआर वेस्टर्न, साऊल, चायनजी सोशल, आशियन डेट, फ्लर्ट विश, गायज ओनली डेटिंग, टूबिट, वी वर्क चायना, फर्स्ट लव लाईव्ह, रीला, कॅशिअर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजीटीव्ही, वी टीव्ही, वीटीव्ही लाइट, लकी लाईव्ह, टाओबाओ लाईव्ह, डिंग टॉक, आईडेंटिटी वी, आयसोलँड 2, बॉक्स स्टार, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, मंचकिन मॅच, कॉनक्विस्टा ऑनलाइन या अ‍ॅपचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here