Home औरंगाबाद भाजी चिरायच्या “चाकूने” प्रा. शिंदेंचा गळा चिरला ; आज अल्पवयीन मारेकरी ताब्यात

भाजी चिरायच्या “चाकूने” प्रा. शिंदेंचा गळा चिरला ; आज अल्पवयीन मारेकरी ताब्यात

27868
0

विहिरीतून रक्ताने माखलेल्या टॉवेलमध्ये डम्बेल, चाकू हस्तगत

औरंगाबाद /प्रमोद अडसुळे

शहरातील बहुचर्चित प्राध्यापक राजन शिंदेंच्या हत्येचा उलगडा आठ दिवसांनंतर करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे मारेकरी हा घरातीलच असून त्याने प्रा. शिंदेंचा गळा भाजी चिरायच्या चाकूने चिरला. दोन्ही हाताच्या नसा अक्षरशः खोलवर चिरल्या. झोपीतच मध्यरात्री पहिला फटका ताकतीने डम्बेल्सने डोक्यात मारला. हत्येसाठी वापलेला चाकू, डम्बेल्स आणि फरशीवर साचलेले रक्त टॉवेलने पुसन जवळच्या विहिरीत फेकले होते. तीन दिवसांपासून पोलीस “त्याच्या” सांगण्यावरून विहिरीत शोध घेत होते. अखेर आज सकाळी विहिरीत टॉवेलमध्ये गुंडाळलेले चाकू, डम्बेल्स पोलिसांनी हस्तगत केले. त्याला विहिरीजवळ पोलीस घेऊन आले होते. त्यानंतर त्याला आजच बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त दीपक गिर्हे यांनी सांगितले.


प्रा. शिंदे नेहमी मारेकऱ्याला रागावत असल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. तू “ढ” आहेस असे हिनवायचे. त्यामुळे मारेकऱ्याच्या डोक्यात शिंदेंबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. त्यातच हत्येच्या रात्री देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातूनच मारेकऱ्याने झोपेतच शिंदेंची निर्घृणपणे हत्या केली. भाजी चिरायच्या चाकूने गळा आणि दोन्ही हाताच्या नसा कापल्या. विशेष म्हणजे हत्येनंतर त्याने रक्ताने माखलेला टॉवेल, चाकू, कटर आणि डम्बेल्स घराजवळच्या विहिरीत फेकले होते. त्याच्या सांगण्यावरून पोलीस विहिरीत गेल्या तीन दिवसांपासून शोध घेत होते. शहर पोलीस दलातील टॉपचे अधिकारी या हत्येचा उलगडा करण्यात आठ दिवसांपासून जंगजंग पछाडत होते. पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे,  सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके, मनोज शिंदे यांच्यासह दिग्गजांची फौज यात दिवसरात्र एक करून पुरावे मिळवण्यासाठी धडपड करत होते. आज सोमवारी सकाळी विहिरीत अखेर रक्ताने माखलेल्या टॉवेलमध्ये चाकू आणि डम्बेल्स मिळून आल्याने पोलिसांनी “त्या” अल्पवयीन मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्याला आजच बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे माहिती देणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here