Home मराठवाडा परळीत सापडलेल्या बालीकेच्या मदतीसाठी डॉ.शालिनीताई कराड यांचा पुढाकार

परळीत सापडलेल्या बालीकेच्या मदतीसाठी डॉ.शालिनीताई कराड यांचा पुढाकार

283
0

डॉ.अजित केंद्रे यांनीही केली वैद्यकीय तपासणी

परळी । परळीत आढळून आलेल्या बेवारस बाळाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या आईचा शोध घेवून पोलिसांनी तिलाही ठाण्यात आणले होते. राज्य बालहक्क आयोगाच्या उपाध्यक्षा डॉ.शालिनीताई कराड यांनी बाळाची व त्याच्या आईची भेट घेवून त्यांची पुढे कोणती व्यवस्था करता येईल यासंदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा केली व मदत करण्याबरोबरच काही सुचनाही केल्या. तसेच इंडीयन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजित केंद्रे यांनी बाळाची पोलिस ठाण्यात येऊन वैद्यकीय तपासणी केली.


बुधवार, दि.16 डिसेंबर रोजी परळीतील नाथ रोडवर बेवारस बाळ आढळून आले होते. ते बाळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 2 तासांनी बाळाच्या आईचा शोध लागला. सदरील बाळाची आई वैफल्यग्रस्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नेमके काय करावे? असा प्रश्न सर्वांसोमोर उभा टाकला होता. राज्य बालहक्क आयोगाच्या उपाध्यक्षा डॉ.शालिनीताई कराड यांनी घटनेची माहीती कळताच थेट पोलिस ठाणे गाठून बाळाची व बाळाच्या आईची भेट घेतली. त्याचबरोबरच त्यांनी बाळाच्या व बाळाच्या आईच्या भवितव्यासाठी काय करता येऊ शकते? यासंदर्भात पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करून काही सुचना केल्या. इंडीयन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा बालरोग तज्ञ डॉ.अजित केंद्रे यांनी बाळाची पोलिस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी केली. विशेष म्हणजे डॉ.केंद्रे यांचा बुधवारी वाढदिवस होता. एकूणच परळीतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीने बाळाला व बाळाच्या आईला नवजीवन प्राप्त होऊ शकले असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here