Home छत्रपती संभाजी नगर संभाजीनगरमधील राड्यावर देवेंद्र फडणवीसाचे आवाहन! म्हणाले, “काही नेते जाणीवपूर्वक…”

संभाजीनगरमधील राड्यावर देवेंद्र फडणवीसाचे आवाहन! म्हणाले, “काही नेते जाणीवपूर्वक…”

254
0

छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा येथे दोन समुदायांमध्ये प्रचंड हिंसाचार झाला आहे. किराडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यानंतर काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही लोकांचा प्रयत्न आहे की भडकवणारे स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहीजे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीचे स्टेटमेंट देऊ नये सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही, असे फडणवीस म्हणाले.
आता संभाजीनगरमध्ये शांतता आहे. ही शांतता अशीच राहिली पाहिजे. काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहिजे म्हणून स्टेटमेंट देत आहेत. ते त्यांनी देऊ नये, असे फडणवीस म्हणाले. चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील हे सगळे दोस्त आहेत. महानगरपालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा गेम केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचं प्लॅनिंग आहे.
देवेंद्र फडणवीस यात मुख्य आहेत आणि त्यांनी हे राजकारण करून महाराष्ट्राच्या जनतेस वेठीस धरलं आहे, असेही खैरे यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here