Home क्रीडा IPL सुरु असताना ड्रग्ज घेतले, इस्लाम स्वीकारला; आता ९ वर्षानंतर RCB मधून...

IPL सुरु असताना ड्रग्ज घेतले, इस्लाम स्वीकारला; आता ९ वर्षानंतर RCB मधून केलं दमदार कमबॅक

450
0

बंगळुरू: सोमवारी १० एप्रिलला चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल २०२३ चा सर्वात रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने लखनऊसमोर २१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते, जे एलएसजीने शेवटच्या चेंडूवर १ गडी राखून पूर्ण केले. या थरारक विजयानंतर लखनऊ संघाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच वेळी, एक असा खेळाडू देखील या सामन्याचा भाग होता, जो इंडियन प्रीमियर लीगदरम्यानच ड्रग्जच्या आरोपाखाली पकडला गेला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जखमी रीस टोपलीच्या जागी ३० वर्षीय वेन पारनेलला बोलावले आहे. अशा स्थितीत लखनऊविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पारनेलने चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात दीपक हुडा आणि कृणाल पांड्याला बाद केले. वेनने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४१ धावांत एकूण ३ विकेट घेतले. २०१४ नंतर पारनेल प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहे. ९ वर्षांनंतर तो पहिला आयपीएल सामना खेळला.

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज वेन पारनेलने २०११ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने २०१२ च्या आयपीएल हंगामातही भाग घेतला होता. पारनेल आयपीएलच्या चौथ्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाचे प्रतिनिधित्व करत होता. त्या मोसमात पुणे कोलकाताविरुद्ध करो या मरो सामन्यात पराभूत झाले, त्यानंतर वेन पारनेल भारतीय खेळाडू राहुल शर्मासोबत पार्टीला गेला. जिथे पोलिसांनी त्यांना पकडले.

खरं तर ती रेव्ह पार्टी होती. दोन्ही खेळाडूंची ड्रग टेस्ट करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे दोघांचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच चिंतेचं वातावरण तयार झालं. या घडलेल्या प्रकारासंबंधित स्पष्टीकरण देताना दोन्ही खेळाडूंनी सांगितले होते की, आम्हाला या रेव्ह पार्टीबद्दल काहीही माहिती नाही, ते कोणाच्या तरी वाढदिवसाच्या पार्टीला आले होते.

वेन पारनेल हा दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तो पूर्वी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवत असे. पण अचानक त्याने २०११ मध्ये २२व्या वाढदिवसाला धर्म बदलला. पारनेलने ३० जुलै २०११ रोजी मुस्लिम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्याने आपले नावही बदलले. आफ्रिकन खेळाडूने आपले नाव वेन डिलन पारनेलवरून बदलून वेन वलीद पारनेल केले. इतकंच नाही तर २०१६ मध्ये पारनेलने आयशा बेकर नावाच्या फॅशन ब्लॉगरसोबत मशिदीत लग्नही केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here