Home मनोरंजन वरूण-नताशाच्या लग्नाची तारीख ठरली…!

वरूण-नताशाच्या लग्नाची तारीख ठरली…!

566
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरून आणि नताशा याच महिन्यात हे त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्याची दाट शक्यता आहे.वरुण-नताशा दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. गेल्यावर्षीच दोघांचे लग्न होणार होते मात्र कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार याच महिन्यात ते लग्न करतील.तसेच हा विवाहसोहळदिवस चालेल.२२ ते २६ जाने.दरम्यान सर्व लग्न विधी होणार आहेत.वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी अलिबागमधील एक हॉटेल बुक करण्यात आले असून लग्न पंजाबी पद्धतीने होणार आहे.

दरम्यान,वरुण धवन आणि नताशा शाळेपासून एकमेकांना ओळखतात आणि अनेक वर्ष ते डेट करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here