Home मनोरंजन आता कंगनाचा शशी थरूरांशी पंगा …. !

आता कंगनाचा शशी थरूरांशी पंगा …. !

242
0

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कधी कोणाशी वाद घालून पंगा वघेची याला काही तोड नाही. आता तिने शशी थरूर याना आपल्या निशाण्यावर धरले आहे. त्याचं कारण म्हणजे अभिनेते कमल हसन यांनी ‘घरकाम करणाऱ्या महिलांनादेखील नोकरीचा दर्जा द्यायला हवा. तसंच घरातील गृहिणींनांदेखील मासिक भत्ता द्यायला हवा. त्या घराची आणि घरातील माणसांची काळजी घेत असतात. ‘असे ट्विट केले होते. यालाच रिप्लाय देत शशी थरूर यांनी एक रिट्विट केले,’कमल हसन, तुमच्या विचाराचं मी स्वागत करतो. प्रत्येक राज्यातील सरकारने घर सांभाळणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाचा भत्ता द्यायलाच हवी. यामुळे महिला शक्तिशाली आणि स्वायत्त होतील.’

आता शशी थरूर यांच्या ट्विटवरून कंगनाने त्यांना ट्विट करूनच सुनावले आहे. ‘प्रेमाला पैशात मोजू नका. आमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी आम्हाला पगाराची गरज नाही. आमच्या छोट्याच्या राज्याच्या आम्ही राणी असतो. त्यासाठी आम्हाला पैशाची गरज नाही. प्रत्येक गोष्टीला व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बघू नका. महिलांना फक्त प्रेम आणि आदराची गरज आहे. त्यांचं प्रेम पैशात मोजू नका.’ अशा आशयाचं ट्वीट कंगनाने केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here