Home जागतिक महामारी सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, प्रशासनाकडून अलर्ट जारी

सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, प्रशासनाकडून अलर्ट जारी

407
0

नवी दिल्ली : देशभरात अनेक राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हळूहळू देशाची चिंता वाढत चालली असून पुन्हा कोरोना डोकं वर काढत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. देशात करोनाचे एकूण 5,880 नवीन रुग्ण आढळले. यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या ३६,१९९ च्या घरात गेली आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आणि मास्क वापरणं आवश्यक आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर महाराष्ट्र आणि राजस्थान या जिल्ह्यांमध्ये करोनाच्या रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आठवड्यामध्ये देशात करोनाच्या रुग्णांमध्ये ७९% टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे गेल्या ७ महिन्यांपैकी सगळ्यात जास्त आहे. इतकंच नाहीतर ज्या राज्यांमध्ये कमी रुग्ण आहे तिथेही करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून आलं.

यामुळे करोनाच्या मृत्यूची संख्याही वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये ६८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला तर या आठवड्यात केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. केरळमध्ये एका आठवड्यात ११ हजार २९६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत २.४ पटीने जास्त आहे. यानंतर महाराष्ट्राचा नंबर येतो. राज्यात ४५८७, दिल्लीमध्ये ३८९६, हरियाणाणध्ये २१४० आणि गुजरातमध्ये २०३० रुग्ण आढळले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईमध्ये करोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे महानगरपालिका आणि प्रशासन सतर्क झालं असून योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील बीएमसीने ६० वर्षांवरील नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याच्या सूचना दिल्या असून डॉक्टर, वैद्यकीय पथक, कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे.सोमवारी मुंबईमध्ये ९५ नवी कोरोनाची प्रकरणं समोर आली असून तर यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये ३२८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून गेल्या ८ दिवसांमध्ये मुंबईमध्ये १५२९ करोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here