Home क्राइम तरुणांनी धावत्या कारमधून चलनी नोटा फेकल्या

तरुणांनी धावत्या कारमधून चलनी नोटा फेकल्या

249
0

हरियाणातील गुरुग्राममधली हि घटना आहे. काही तरुणांनी धावत्या कारमधून चलनी नोटा फेकल्या आहेत. या नोटा फेकतानाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना गुरुग्राम येथील गोल्फ कोर्स रोडवर घडली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
सोशल मीडियावरील वायरल व्हिडिओद्वारे पोलिसांनी या बाबतची माहिती मिळाली. ज्यामध्ये दोन व्यक्तीनी गोल्फ कोर्स रोडवर कारमधून चलनी नोटा फेकून चित्रपटातील दृश्य पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला असून. या घटनेची दखल घेत हा प्रकार करणाऱ्यांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह यातील मुख्य आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती डीएलएफ गुरुग्रामचे अतिरीक्त पोलिस प्रमुख विकास कौशिक यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here