Home क्रीडा सुनील गावस्कर यांचा भारताला मोलाचा सल्ला:फक्त एकच बदल करा आणि WTC Final...

सुनील गावस्कर यांचा भारताला मोलाचा सल्ला:फक्त एकच बदल करा आणि WTC Final जिंका

221
0

मुंबई : भारतीय संघ आता WTC Final जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. पण जर भारताला ही फायनल जिंकायची असेल तर त्यांनी संघातील एका खेळाडूला बाहेर काढायला हवे, असा सल्ला आता भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी दिला आहे.भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रॉ राहीला होता. पण भारताने ही मालिका जिंकली. दुसरीकडे श्रीलंकेला न्यूझीलंडकरून पराभव पत्करावा लागला आणि भारत विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणार हे निश्चित झाले. पण भारतापुढे या फायनलमध्ये आव्हान असणार आहे ते ऑस्ट्रेलियाचे. भारताची ऑस्ट्रेलियाबरोबर नुकतीच चार कसोटी सामन्यांची मालिका पार पडली आहे. या मालिकेत भारताचा एक खेळाडू सातत्यने अपयशी ठरला आणि त्यामुळेच त्याला संघाबाहेर करा, अशी मागणी आता गावस्कर यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे.सुनील गावस्कर यांनी सांगितले की, ” भारताला जर अंतिम सामना जिंकायचा असेल तर त्यांना संघात एक मोठा बदल करावा लागेल. भारतीय संघाने या मालिकेत लोकेश राहुलला जास्त संधी दिली नाही पण त्याला अंतिम फेरीत संधी द्यायला हवी, असे मला वाटते. कारण तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा संघाला अंतिम फेरीत फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी भारतीय संघाला आपल्या रणिनीतीमध्ये बदल करावा लागेल. कारण सध्याच्या घडीला राहुल हा संघात नाही. पण राहुलला आपण यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज या रुपात पाहू शकतो. राहुल ५ किंवा ६ स्थानावर खेळायला आला तर भारताची फलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते.”सधाच्या घडीला भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी ही के एस भरतकडे दिली होती. पण या मालिकेत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे राहुलही फ्लॉप ठरला आणि सलामीवीर म्हणून त्याला संघाबाहेर करण्यात आले. पण फायनलमध्ये भारताला जर आपला संघ अधिक बळकट करायचा असेल तर ते राहुलला यष्टीरक्षकाची जबाबदारी देऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here