Home मनोरंजन चक्क मूनवॉक करून ट्रॅफिक कंट्रोल करतो हा वाहतूक पोलीस…!

चक्क मूनवॉक करून ट्रॅफिक कंट्रोल करतो हा वाहतूक पोलीस…!

581
0

मराठवाडा साथी न्यूज

इंदोर : आपण बघितलेच असेल की ट्रॅफिक पोलीस शिट्टी वाजवून किंवा हातवारे करून ट्रॅफिक नियंत्रणात आणतात.मात्र,सध्या सोशल मीडियावर एक ट्रॅफिक पोलीस चक्क मूनवॉक करत ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एका ट्रॅफिक पोलिसाच्या या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.रणजीत सिंह असे या ट्रॅफिक पोलिसाचे नाव असून तो मायकल जॅक्सनच्या स्टाईलमध्ये मूनवॉक करत ट्रॅफिक कंट्रोल करत आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना रणजित सिंह यांनी सांगितले की, ‘१६ वर्षांपासून मी डान्स करत ट्रॅफिक कंट्रोल करत आहे.एका घटनेने मला बदलले.त्यादिवशी मला कम्युनिकेशन डिव्हाइसवरून एका ठिकाणी अपघात झाला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे जा असा आदेश आला. मी घटनास्थळी दाखल झालो तेव्हा मला कळाले की अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती माझा मित्र आहे. रागाच्या भरात रस्ता ओलांडून जात असताना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं तुझी हालचाल पाहून लोक थांबले आहेत. त्यानंतर मी आपल्या कामात डान्सचा वापर करण्यास सुरुवात केली. मूनवॉकच्या माध्यमातून मी ट्रॅफिक कंट्रोल करायला लागतो.’

दरम्यान,रणजित विषयी अधिक माहिती देत वरिष्ठ अधिकारी प्रशांत चौबे यांनी सांगितले की, ‘रणजित सिंह आपल्या कामात पारंगत आहे. ज्या चौकामध्ये ते कार्यरत आहेत त्याठिकाणी वाहनांची रहदारी चांगली असते. त्यांची ही स्टाईल आहे ज्याद्वारे ते नागरिकांना थांबवतात पण ते त्यांच्याशी भांडत नाहीत. या कामाबद्दल ट्रॅफिक पोलिस रणजीत सिंह यांना बेस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. ते ट्रॅफिक पोलिसांना चांगल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ट्रेनिंग सुद्धा देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here