Home मनोरंजन पोलिसांनी मला मारले – अर्णब गोस्वामी

पोलिसांनी मला मारले – अर्णब गोस्वामी

330
0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं . अर्णब गोस्वामी यांना कोर्टात हजर करुन पोलीस त्यांच्या रिमांडची मागणी करणार आहेत. दरम्यान, यावेळी अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊन दिली नाहीत, मला पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचा आरोपही अर्णबने केला.

पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 ला आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

बुधुवारी [आज ] पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्वीट केलं आहे. “काही काळापूर्वी इंडियाज मोस्ट वॉण्टेड नावाचा शो होता आणि अँकर हत्या, आत्महत्या या मुद्द्यावर भाष्य करत असे. पण याच अँकरला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2 आहे. दुसरा अँकर तेच करतोय, आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकार किती जणांचे आवाज दाबणार : कंगना रनौत
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर अभिनेत्री कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार आणखी किती जणांचा आवाज दाबणार, असा सवाल तिने व्हिडीओ पोस्ट करुन विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here