Home मनोरंजन फोटो काढल्यामुळे भडकल्या जया बच्चन…!

फोटो काढल्यामुळे भडकल्या जया बच्चन…!

1128
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या पूर्वीपासूनच शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढलेले त्यांना कदापी आवडत नाही. त्यामुळे खूपदा त्या फोटोग्राफर आणि चाहत्यांवर रागावताना दिसतात.महत्वाचे म्हणजे याच कारणामुळे त्या सदैव चर्चेत असतात. यंदाही त्या याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.मात्र,यावेळी आपल्या चुकीचे स्वीकार करीत एका फोटोग्राफरने त्यांची माफी देखील मागितली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जया बच्चन ह्या काही दिवसांपूर्वी दाताच्या दवाखान्यात जाताना दिसल्या. त्या गाडीतून खाली उतरताच एका फोटोग्राफरने त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली.मात्र,अशाप्रकारे जया यांचे फोटो काढणे त्या फोटोग्राफरला महाग पडले.कारण फोटोग्राफरने फोटो काढताच गाडीतून चालक बाहेर आला आणि त्याने फोटो न घेण्याबद्दल सांगितले.मात्र, तोपर्यंत जया यांचा रागाचा पारा चढला होता. ‘तुम्ही इथे पण येता का?’ असा रागात प्रश्न त्यांनी विचारला.यावर उत्तर देताना छायाचित्रकार म्हणाले की, ‘तुमची गाडी पाहून आम्ही इथे आलो.’ यानंतर छायाचित्रकारांनी जया बच्चन यांची माफी मागितली.

https://www.instagram.com/p/CJ9Kr82hflB/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here