Home आरोग्य आज ४३ केंद्रावर लसीकरण ; औरंगाबाद मनपाला सात हजार लस प्राप्त

आज ४३ केंद्रावर लसीकरण ; औरंगाबाद मनपाला सात हजार लस प्राप्त

2348
0

मराठवाडा साथी न्यूज /औरंगाबाद 

मनपाला मंगळवारी सात हजार लस प्राप्त झाली आहे. यामुळे आज बुधवारी  ४३ केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. मनपाने  शहरात जंम्बो लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु महापालिकेला लस मिळत नसल्यामुळे लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत आहे. जुलै महिन्यात केवळ दहा दिवस लसीकरण झाले. त्यामुळे दुसरा डोस घेण्याच्या प्रतिक्षा यादीत वाढ झाली आहे. आतापर्यंत ५ लाख ९० हजार २०५ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये पहिला डोस घेतलेले ४ लाख १८ हजार १३५ तर दुसरा डोस घेतलेले १ लाख ७२ हजार ७० नागरिकांनी लस घेतली आहे.

लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु वारंवार लसीकरणाला ब्रेक लागत असल्याने उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडथळा येत आहे. दोन दिवस लस न मिळाल्याने लसीकरण बंद ठेवावे लागले. पूणे येथे लस आणण्यासाठी वाहन पाठविण्यात आले आहे. महापालिकेला सात हजार लस मिळाली. त्यामुळे आज बुधवारी लसीकरण होणार आहे. महापालिकेने ४३ वेंâद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली आहे. ३४ वेंâद्रावर दुसरा डोस दिला जाणार असून ५ वेंâद्रावर पहिला डोस मिळणार आहे. तसेच कोवॅक्सिनसाठी तीन वेंâद्र ठेवण्यात आली आहे. प्रोझोन मॉल या ठिकाणी देखील ड्राईव्ह इन करिता लसीकरण वेंâद्र असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here