Home महाराष्ट्र मराठा आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा-नरेंद्र पाटील

मराठा आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा-नरेंद्र पाटील

मराठा आरक्षणाचा प्रश्न अशोक चव्हाण यांना योग्य पध्दतीने हाताळता येत नसल्यामुळे समाजाच मोठ नुकसान होत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या समिती अध्यक्ष पदावरून चव्हाण यांना हठवून एकनाथ शिंदे यांना नियुक्त करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

80
0

मराठवाडा साथी न्यूज

कराड : मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यकत केलं आहे. यावेळी अशोकराव चव्हाणांनी मराठा समाजाला थर्ड लावला. चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता त्यामुळे अशोक चव्हाणांना पदावरून काढून टाका अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. 

शिवसेना – भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असल्याने त्यांना हटवावं. अशात मोठं योगदान असलेल्या एकनाथ शिंदे यांची अध्यक्षपदी असावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडेही केलेली होती असं आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती की, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे, त्यांचे त्यांना अध्यक्ष करा. कारण ज्यावेळेला भाजप- शिवसेनेचे सरकार होतं. त्यावेळेच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते.

मराठा समाजाच्या मुले- मुलींच्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले वसतिगृह जे झाले ते एकनाथ शिंदेनी केले. यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवलं, त्यांनी मराठा समाजाला थर्ड लावला अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी चव्हाणांनावर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here