Home ठाणे ठाणे ते नाशिक150 किमीचा प्रवास तासाभरात

ठाणे ते नाशिक150 किमीचा प्रवास तासाभरात

387
0

ठाणे: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना चांगल्या रस्त्यांनी जोडण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मागच्या २ते ३ वर्षात विवीध शहरे चांगल्या रस्त्यांमुळे जोडली गेल्याने दळणवळण सोपे झाला आहे. समृद्धी महामार्गाने नाशिक, नागपूर, औरंगाबाद हे मार्ग जोडले गेले आहेत तश्याच पद्धतीने ठाणे आणि नाशिक हा मार्ग जोडण्याचे काम सुरू आहे. पुढच्या वर्षी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याने याचा फायदा पुढे राज्याची उपराजधानी नागपुरलाही होणार आहे.या मार्गाने पुढे गुजरातला जाणे सोपे व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेला आणि चार वर्षांपासून रखडलेल्या माजिवडा ते महामार्गाच्या आठपदरीकरणाच्या कामाने अखेर वेग घेतला आहे.एमएसआरडीसीने २३.६किमीच्या महामार्गाच्या आठपदरीकरणाच्या कामाला वेग देत काही महिन्यांतच १० टक्के काम पूर्ण केले आहे. उर्वरित काम जून २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.नाशिक ते ठाणे राष्ट्रीय महामार्ग ३ वरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग ३ वरील माजिवाडा ते ठाणे अशा २३.५ किमी मार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय कंत्राटदाराची निवड करत कामाला सुरुवात करण्यात आली.मात्र कंत्राटदाराने कामच सुरू केले नाही आणि प्रकल्प रखडला. मात्र हा प्रकल्प मार्गी लावणे अत्यंत गरजेचे असल्याने आणि त्यात एमएसआरडीसीने हे काम पूर्ण करण्याची तयारी दाखविल्याने शेवटी एक वर्षापूर्वी हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे सोपविण्यात आला. महामार्ग प्राधिकरणाचा प्रकल्प एमएसआरडीसी आता मार्गी लावत आहे.एमएसआरडीसीकडे प्रकल्प आल्यानंतर आवश्यक त्या मंजुरी घेत काही महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली आहे. हे काम सध्या वेगात सुरू असून आतापर्यंत १० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अंदाजे ११०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून हा निधी महामार्ग प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.हा प्रकल्प लवकर पूर्ण करत ठाणे ते नाशिक प्रवास वेगवान करणे आवश्यक असल्याने एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आहे. उर्वरित काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करत महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्याचा प्रयत्न एमएसआरडीसीचा आहे.या महामार्गावरून पुढे समृद्धी महामार्गाला जाणे सोपे व्हावे या मुख्य उद्देशाने एमएसआरडीसीने रखडलेले आठपदरीकरण पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे ते नाशिक प्रवास सुसाट आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. त्याच वेळी समृद्धी महामार्गाने नागपूरला जाणेही सोपे होणार आहे. तेव्हा समृद्धीचा संपूर्ण टप्पा लवकरच पूर्ण होणार असल्याने माजिवडा ते वडपे आठपदरीकरणही शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीचा प्रयत्न आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here