Home महाराष्ट्र तुम्हालाही लवकरच Chance मिळेल……. !

तुम्हालाही लवकरच Chance मिळेल……. !

5897
0

तपासे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा खोचक सवाल महाविकास आघाडी सरकारला विचारला होता. त्यावर महेश तपासे यांनी त्यांना उत्तर देत चांगलाच टोला लगावला आहे. .“मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल”, असं उत्तर महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

“देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांचीही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार मुंबईत मेट्रो-३ लवकरच सुरू करेल याचा मला विश्वास आहे. सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. असे प्रकार थांबले तर मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल”, असंही तपासे यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here