Home आरोग्य मोबाइल गेमिंगमुळे लक्ष विचलित व हृदयविकाराचा धोका वाढतो

मोबाइल गेमिंगमुळे लक्ष विचलित व हृदयविकाराचा धोका वाढतो

564
0

औरंगाबाद: मोबाइल गेमिंगमुळे आरोग्याला मोठया प्रमाणात धोका वाढतं आहे . भारतीय गेमर्स एका आठवड्यात ऑनलाइन गेम खेळण्यासाठी सरासरी ८.३६ तास घालवतात, हे जगात सर्वाधिक आहे. सुमारे ६० टक्के भारतीय गेमर्स एका वेळी ३ तास सतत गेम खेळतात. २०२० ते २०२१ दरम्यान हा आकडा ४.१ तासांपासून ५.५ तासांपर्यंत होता असे. स्टेट ऑफ ऑनलाइन गेमिंग नावाच्या अहवालानुसार सांगण्यात आले आहे . २०२० मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले की, २० वर्षांखालील ६५ टक्के मुले ऑनलाइन गेमसाठी अन्न आणि झोप सोडण्यास तयार आहेत. न्यूयॉर्कच्या हृदयरोगतज्ज्ञ निका गोल्डबर्ग यांच्या मते, मोबाइल गेमिंगमुळे तणाव आणि रक्तदाब वाढू शकतो. फ्रंटियर्स इन सायकॉलॉजीमधील संशोधन सुचवते की, या गेममुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याच वेळी मोबाइल गेमिंगमुळे एका मर्यादेनंतर शारीरिक स्थिती आणि डोळ्यांवर परिणाम होतो.मोबाइल गेमिंगचा हृदय आणि मनावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया . स्वतःवरील नियंत्रण कमी होऊ लागते दीर्घकाळ मोबाइल किंवा ऑनलाइन गेमिंगमुळे गेमचे व्यसन किंवा इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरचा धोका वाढतो. मोबाइल गेमिंगचा दीर्घकाळ वापर केल्याने चिडचिड, एकटेपणा, इतर कामांमध्ये रस कमी होणे अशा तक्रारी होऊ शकतात. सर्वात मोठा धोका स्वतःवर नियंत्रण ठेवू न शकण्याच्या समस्येच्या रूपात येतो. गेमर त्यांच्या चिंता आणि अपराधीपणा टाळण्यासाठी अधिक गेम खेळतो .बाॅडी पोश्चरवर परिणाम होतो तसेच मणक्याचे नियंत्रण करणाऱ्या स्नायूंवर परिणाम दीर्घकालीन गेमिंगमुळे बाॅडी परिणाम होतो. खरे तर गेमिंगदरम्यान शरीर रोलिंग सुरू होते, खांदे झुकतात आणि डोके पुढे झुकते, याचा थेट परिणाम मणक्याशी आणि शरीराच्या संरचनेशी संबंधित स्नायूंवर होतो, यामुळे शरीरावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागते. पचनाच्या समस्या आणि हार्ट बर्नच्या तक्रारी येऊ शकतात. मानसिक समस्याही वाढतात.डोळ्यांना हानी होते व एकाग्रता कमी होते डोळ्यांमध्ये लालसरपणा, कोरडेपणा आणि जळजळ वाढते, मानसिक तणावामुळे काही तरी खाण्याची इच्छा वाढते स्क्रीनसमोर बराच वेळ बसल्याने लठ्ठपणा देखील येतो पण याचे काही फायदे देखील आहेत , पण अट अशी आहे की, तो मर्यादित प्रमाणातच खेळला गेला पाहिजे.मर्यादित मोबाइल गेमिंग खेळल्यास मेंदूची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. मानसिक ताण कमी होतो. याशिवाय आरोग्य आणि खाण्यापिण्याशी संबंधित गेम खेळल्याने चांगल्या सवयी लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here