Home मुंबई गडकरींनी शेअर केला मुंबई-गोवा महामार्गाचा ‘ड्रोन व्ह्यूव

गडकरींनी शेअर केला मुंबई-गोवा महामार्गाचा ‘ड्रोन व्ह्यूव

526
0

मुंबई :बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.”मुंबई-गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील कोकणातील 66 पर्यटन स्थळांना स्पर्श केला आहे. यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. तसेच फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूकही करणे सोपं होणार असल्याचं गडकरींना सांगितलं.
नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटवर काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटमध्ये गडकरी म्हणाले की मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी केली. या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे.


गडकरी म्हणाले की त्यांचे मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह आधारित भाडे संकलन सुरू करण्यासाठी प्रयत्नशीलआहे.तसेच पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्राने अभ्यास केला पाहिजे, असही गडकरी यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here