Home मुंबई शिक्षण घेण्यासाठी तरी ‘लोकल’ सुरू करा…!

शिक्षण घेण्यासाठी तरी ‘लोकल’ सुरू करा…!

359
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा,महाविद्यालय,आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होत आहेत.मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत यामुळे शिक्षण घेण्यासाठी तरी किमान विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी,अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबईतील हॉटेल, बार, पब, डिस्को हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या नाइट लाइफसाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर कोणतेही बंधने नाहीत. मात्र शाळकरी विद्यार्थी, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमुभा नसल्याने मोठ्या त्रासातून जावे लागत आहे.

दरम्यान,विध्यार्थ्यांना कसारा-कर्जत भागांतील वाहतुकीच्या सुविधांची कमतरता आणि त्यांना लागणारा खर्च आता परवडेनेसा झाला आहे.यामुळे लोकलमुभा देऊन त्यांना दिलासा देण्यात यावा,अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here