Home इतर खरा चेहरा आला समोर…!

खरा चेहरा आला समोर…!

349
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्य समिती च्या बैठकीदरम्यान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे.बैठकीदरम्यान गोस्वामीवर टीका करत म्हणाल्या की,इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे.पुढे सहकाऱ्यांशी संवाद साधत त्या म्हणाल्या की,शेतकरी संघटनांसोबत चर्चेच्या नावावर हैराण करणारी असंवेदनशीलता आणि अहंकार मोदी सरकारने दाखवले आहे.

दरम्यान,अर्नब गोस्वामी च्या लीक झालेल्या व्हॉटसअप चॅटिंग प्रकरणाचा उल्लेख करताना ‘राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा कशापद्धतीने वेशीवर टांगण्यात आला,याचे धक्कादायक उदाहरण आपण पाहिले आहे.जे लोक इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटतात त्यांचा आता पर्दाफाश झाला आहे’असे देखील यावेळी सोनिया म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here