Home महाराष्ट्र दैनिक मराठवाडा साथीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन बाल-धमाल स्पर्धांचे आयोजन

दैनिक मराठवाडा साथीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन बाल-धमाल स्पर्धांचे आयोजन

255
0

30 जानेवारी पर्यंत स्वीकारले जाणार प्रवेश

परळी l शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी दैनिक मराठवाडा साथीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन बाल-धमाल स्पर्धांचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. आजपासून दि.30 जानेवारी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील सहभागाचे व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. बाल-धमाल स्पर्धांचे हे सलग 8 वे वर्ष असून, यंदाच्या स्पर्धा पहिल्यांदाच ऑनलाईन होत आहेत. बाल-धमाल या स्पर्धा विद्यार्थी विश्वात फार लोकप्रिय आणि आवडीच्या स्पर्धा ठरल्या आहेत.
दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षांपासून बाल-धमाल स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या स्पर्धा जिल्हास्तरीय होतात मात्र यंदा ऑनलाईन असल्याने या स्पर्धांचे स्वरूप राज्यस्तरीय करण्यात आले आहे. यावर्षीच्या आयोजनात काही स्पर्धा घेणे शक्य नसल्याने त्या वगळण्यात आल्या आहेत. 2021 च्या बाल-धमाल मध्ये एकूण सात स्पर्धा होत आहेत. त्यामध्ये वेशभूषा, एकपात्री अभिनय, वक्तृत्व, सामूहिक नृत्य, सामूहिक गायन, वयक्तिक गायन, वयक्तिक नृत्य आदी स्पर्धांचा समावेश असणार आहे. प्रि-प्रायमरी, इयत्ता 1 ली ते 5 वी, 6 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल. येत्या 30 जानेवारी पर्यंत स्पर्धकांनी आपापले व्हिडीओ 9607072505 या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here