Home बीड जिनिंग मालकांची गतवर्षीची बिले थकली ; पणन महासंघाच्या कापूस प्रक्रिया टेंडरवर बहिष्कार

जिनिंग मालकांची गतवर्षीची बिले थकली ; पणन महासंघाच्या कापूस प्रक्रिया टेंडरवर बहिष्कार

601
0

धारूर : गतवर्षी कोरोना संकट काळात कामगारा सह जिव धोक्यत घालून कापूस खरेदी करून व प्रक्रिया करुन हि अद्याप पर्यंत पणनमहासंघाने जिंनिग मालकाचे खरेदीचे बीले अदा न करता उलट जिंनीग मालकाचे बीलात कपात करण्याचे चुकीचे धोरण अंवलबल्या मुळे पणण महासंघाचे प्रक्रीया टेंडरवर बहीष्कार घालण्याचा निर्णय जिंनीग मालकानी घेतल्याने कापूस खरेदी सुरु होल्यास विलंब लागणार असून कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे.
हंगाम 2019-20 चे अनेक जिनिंग मालकांचे बिल पणन महासंघाने अदा केलेले नाही.आणि कोवीड -19 मध्ये लाॕकडाऊन झाले.असताना मार्चमध्ये खरेदी बंद करण्यात आली,नंतर मे मध्ये खरेदी चालू करण्यात आली जिनिंग मालका कडे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा पूर्ण नसताना सुद्धा कोवीड -19 या महामारी च्या काळात सुद्धा आपला आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून शासनाच्या निर्णयानुसार खरेदी चालू ठेवून शेतकऱ्यांचा कापूस संपे पर्यंत जिंनीग मालकानी जून जुलै-ऑगस्ट खरेदी केली शेतकऱ्यांचा कापूस पावसात भिजून जिनिंग वर त्याचे नुकसान झाले हे नुकसान होत असताना जिनिंग मालकांनी वेळोवेळी पणन महासंघ कळविले परंतु त्यांनी दखल घेतली नाही पणन महासंघाचे प्रतिनिधी म्हणून ग्रेडर त्याठिकाणी काम पाहत होते त्यांना सुद्धा होणारे नुकसान कळत होते. परंतु त्यांनी सुद्धा खरेदी थांबवली नाही आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये जिनिंगचे बिल पेंडिंग असून पणन महासंघाणे नुकसाना पोटी जिनिंग मालकाच्या बिलातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिनिंग मालकांना मान्य नाही. त्यामुळे या टेंडर प्रक्रीये वर सर्व जणांनी बहिष्कार टाकलेला आहे.यामुळे कापूस खरेदी लांबणीवर पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत. आहे तरी यामध्ये पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून शेतकऱ्यांचा कापूस लवकरात लवकर विकून त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला मिळेल आणि त्यांची दिवाळी सण साजरा होण्यास मदत होईल.
उद्योग क्षेत्र अडचणीत असताना पण न महासंघाचा एकतर्फी निर्णय जिनिंग उद्योगावर मोठे संकट निर्माण करणार आहे त्यामुळे हा उद्योग जिवंत राहणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. त्यामुळे जिंनीग मालकाची केलेले चुकीची बील कपात रद्द करून गतवर्षीचे पैसे तात्काळ द्यावेत आशी मागणी होत आहे.

बीलातील चुकीची कपात तात्काळ रद्द करणे गरजेचे-नितीन काळे
गतवर्षी कठीण परीस्थीती आसताना प्रशासन व पणण महासंघ यांचे अग्रहा मुळे उशीरा पर्यंत कापूस खरेदी केली मजूर व मालक यांनी जिव संकटात घालून काम केले शेतकऱ्यांचे हित जोपासले .माञ जिंनीग मालकाचे बीलात चुकीची कपात करून अन्याय केला आहे .गतवर्षीचे बील कपात न करता तात्काळ द्यावीत मगच कापूस खरेदी प्रक्रीयेत जिंनीग मालक सहभागी होतील आसे जिंनीग प्रेसिंग असोसिएशन चे समन्वय संघटक नितीन काळे यांनी सांगीतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here