Home मनोरंजन कंगनाला दणके देणाऱ्या उर्मिलाला आमदारकी

कंगनाला दणके देणाऱ्या उर्मिलाला आमदारकी

5
0

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत ज्या पद्धतीने उर्मिला मातोंडकरांनी फैलावर घेतले होते. त्याचे फळ शिवसेनेने त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन परतफेड केली, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उर्मिलांशी संपर्क साधला आणि उर्मिलांनी विधान परिषदेसाठी हो कारही कळविल्याचे समजते आहे.

ज्या पद्धतीने उर्मिला यांनी मराठी माणसाची बाजू घेत कंगनाला फैलावर घेतले होते. त्याचीच ही परतफेड असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून सरकारवर आरोप प्रत्यारोप होत होते. सुशांत सिंहने आत्महत्या केल्यानंतर कंगना राणावत हिने आधी सिनेसृष्टी आणि मग मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार आणि थेट मुख्यमंत्र्यांवर एकेरी शब्दात हल्ला चढवला. त्यावेळी सिनेसृष्टीतून कोणी बोलत नव्हते. पण उर्मिला मातोंडकर यांनी मात्र प्रसारमाध्यमातून कंगना राणावत हिच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. महाराष्ट्र ते मुंबई पोलीस यांचा बचाव उर्मिलाने करत बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला दिलासा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here