Home मराठवाडा मातोरी शिवारात बिबट्याची अफवा

मातोरी शिवारात बिबट्याची अफवा

अफवांवर विश्वास नठेवता खबदारी बाळगावी: रात्रीतून जवळपास चाळीस किलोमिटर भ्रमंती करतो. त्यामुळे सहाजीकच पाथर्डी –आष्टी-शिरुर कासार या अंतरामध्ये सौम्य आहे. सोशल मिडीयावर व्हायरल संदेशाची खात्री करावी. शक्यतो वस्ती, गोठ्यांवर विजेचा प्रकाश करावा. किमान बिबट्या पिंजरा बंद होई पर्यंत महिला, बालकांनी एकट्या ऐवजी जमावाने शेती कामे करावीत. परिसरात काही संशयास्पद दिसून आल्यास तात्काळ वनविभागाच्या हेल्पलाईनवर माहिती द्यावी. याशिवाय बिबट्या दिसून आल्यास त्यावर हल्ल्याचा प्रयत्न करुन नये असे अवाहन करण्यात आले आहे.

23
0

मराठवाडा साथी न्यूज

मातोरी :  पाथर्डी (जि. अहमदनगर) तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्याचे विभागाकचे प्रयत्न फोल ठरल्याने  बीड- अहमदनगर जिल्ह्यांच्या सिमावर्ती भागात अफवांना पेव फुटले आहे. सोशल मिडीयावरील व्हायरल मसेजमुळे  मंगळवारी दि. 3 मातोरी( ता.शिरुर) शिवारात बिबट्याच्या धास्तीने शेतकरी, नागरीकांनी हातातले काम टाकून दुपारीच धरांकडे धाव घेतली.

  पाथर्डी तालुक्यात गेल्या आठवडा भरापासून दहशत पसरविणाऱ्या नरभक्षक बिबट्यास पकडण्यात वन विभागाचे प्रयत्न अत्तापर्यंत तरी फोल ठरले आहेत. त्यामुळे बीड- अहमदनगर च्या सिमावर्ती भागात नरभक्षक बिबट्याचा वावर आहे. गेल्या आठवड्यात या नरभक्षक बिबट्याने पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी शिरापूर येथील (एकून तीन) बालकांचा फरफटत नेत बळी घेतला.

दरम्यान, पाथर्डी, शेवगाव  सिमावर्ती भागातील शिरुर, आष्टी, तालुक्यात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे राज्यभरातील विशेष पथकं पाथर्डी तालुक्यात तळ ठोकून आहेत. मात्र, अद्याप नरभक्षक बिबट्यास पकडण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने मोकाट बिबट्याच्या धास्तीने बीड- अहमदनगर जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील नगगरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतात कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना वनविभागाकडून सतर्कतेच्या सुचना देण्यात येत असल्या तरी सोमवारी दि. 2 मातोरी शिवारातील अकरा ऋषी समाधी स्थळ (मठ) परिसरात प्रतत्यक्षदर्शी बिबट्या दिसल्याची सोशल मिडीयाद्वारे अफवा पसरल्याने रात्रभर गावशिवारातील वस्त्यांवरच्या नगारीकांच्या झोपा उडाल्या.

शेती काम सोडून नगारीकांची घरांकडे धाव :  पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्या मातोरी शिवारात दाखल झाल्याची सोशल मिडीयाद्वारे अफवा पसरल्याने मातोरी, पारगाव (घो.), माळेगाव (च),बोरगाव शिवारात शेती काम करणाऱ्या नागरीकांनी हातातले काम टाकून घरांकडे धाव घेतली.

वनविभागाचा फौजफाटा तैनात: पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ व बीड जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे राज्यभरातील विशेष पथक पाथर्डी तालुक्यात तळ ठोकून आहेत तर एकून 80 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

ड्रोन  कॅमेऱ्याची टेहळणी  : पार्थीसह बीड जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकण्यासाठी वन विभास अपयशाचा समाना करावा लागल्याने उपाय योजना तैनात करण्यात आल्या आहेत. संशयीत गावशिवारांची दोन ड्रोन  कॅमेऱ्यांद्वारे टेहळणी करण्यात येत असून. ठिकठिकाणी 25 ट्रॅक कॅमेऱ्याद्वारे हालचाली टिपण्यात येत आहेत. या शिवाय अकरा पिंजरे लावण्यात आले आहे.

वनविभागाची दमछाक : नगर-बीड जिल्ह्यांच्या सिमावर्ती भागात संचार करणाऱ्या नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी नगरसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगांव जिल्हा वन विभागाचे विशेष पथक तळ ठोकून आहेत. सुजान नागरीकांकडून दक्षता पाळण्यात येत असली तरी सोशल मिडीयावर  बिबट्याच्या चित्रफिती व्हायरल होत असल्याने  बीड उपवन विभागाकडून आष्टी,शिरुर तालुक्याचा परिसर शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here