Home jobs मुंबईतील ‘माटुंगा रेल्वे स्टेशनवर महिलाराज

मुंबईतील ‘माटुंगा रेल्वे स्टेशनवर महिलाराज

259
0

मुंबई : जगभरात प्रत्येक क्षेत्रात आता महिलांनी प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी फक्त पुरुषांसाठी समजल्या जाणाऱ्या काही क्षेत्रातही महिलांनी यशस्वी शिरकाव केला असून तिथंही ठसा उमटवलाय. काही क्षेत्रांमध्ये तर महिलांनी त्यांच्या कामानं आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. जगभरात आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या, आपल्या कुटुंबासाठी सर्व प्रकारचे त्रास सहन करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्याविकासातही महिला शक्तीचा मोठा वाटा आहे. मध्य रेल्वेवरील नेहमी गजबज असणाऱ्या माटुंगा रेल्वे स्टेशनचा सर्व कारभार महिलाच करतात.

तिकीट वाटपाचे काम असो की माटुंगा रेल्वे स्थानकावरील गाड्या चालवणे, सर्व कामे महिला करतात. स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारीही महिलांच्या हाती आहे. महिला कर्मचाऱ्यांमुळे विशेषत: महिला प्रवाशांना या स्थानकात सुरक्षितता वाटते. येथे कार्यरत ३८ महिला कर्मचाऱ्यांपैकी महिला ऑपरेशन्स, कमर्शियल विभागात, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, तिकीट तपासणी, उद्घोषक, संरक्षण कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथील स्टेशन प्रबंधक देखील एक महिला आहे. मध्य रेल्वेवरील फक्त महिलांकडून कारभार चालविला जाणारं माटुंगा हे पहिलं रेल्वे स्टेशन आहे.

स्टेशन प्रबंधक मीना शंकर सेंटी यांनी या कारभाराबद्दल आपला अनुभव सांगितला आहे. ‘ संपूर्ण महिलांकडून चालवणाऱ्या जाणाऱ्या स्टेशनमध्ये काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. २०१७ साली ही जबाबदारी आम्हाला मिळाली. त्यानंतर गेली ६ वर्ष आम्ही ती व्यवस्थित सांभाळत आहोत.

‘या स्टेशनवर यापूर्वी महिला आणि पुरुष दोघेही काम करत होते. मात्र 2017 साली जीएम शर्मा साहेबांनी संपूर्ण महिला स्टेशनची संकल्पना मांडली. आम्ही करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला डीआरएम पुरस्कार देखील मिळाला आहे,’ असं तिकीट प्रबंधक नीता यांनी सांगितलं.

‘१६ ऑक्टोंबर १९९९रोजी माटुंगा स्थानकावर सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या अर्चना माने गेल्या २४ वर्षांपासून या स्टेशनवर काम करत आहे. त्यांनी अनेक स्टेशन मास्टर पाहिले आहे. मात्र महिलांच्या हातात स्टेशनची जबाबदारी आल्यापासून या स्टेशनची प्रगती झाली आहे. स्वच्छतेपासून प्रत्येक गोष्ट इथं महिला पाहातात,’ याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘गेल्या पाच वर्षांपासून त्या माटुंगा स्थानकावर कार्यरत आहे. त्यांच्या सोबत ८ महिला टीसी म्हणून कार्यरत आहेत. आज पर्यंत कोणाचीही तक्रार आली नाही. आम्हाला इथे काम करताना अगदी आनंद होतो. यापुढे सुद्धा असच काम करत राहू अशी अपेक्षा आहे,’ असं तिकीट तपासक अस्मिता मांजरेकर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here