Home मनोरंजन शाहरुखला मिळालं बर्थडेचं खास गिफ्ट; बुर्ज खलिफा टॉवरवरुन किंग खानला शुभेच्छा

शाहरुखला मिळालं बर्थडेचं खास गिफ्ट; बुर्ज खलिफा टॉवरवरुन किंग खानला शुभेच्छा

10
0

मुंबई : जगातील सर्वांत उंच बिल्डिंग असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावर बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानला त्याच्या 55 व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या. बुर्ज खलिफावर शाहरुख खानला त्याच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, डॉन आणि रा-वन मधील भूमिकांचे फोटो दाखवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या काचेच्या इमारतीवर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून प्रोजेक्शन करून शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर त्याने त्याच्या या शुभेच्छांबद्दल आपल्या ट्विटर आणि इन्टाग्राम अकाऊंटवर आभार मनात एक सुंदर मेसेज लिहिला. यामध्ये त्याने आपली मुलं सुहाना, आर्यन आणि अब्राहम इम्प्रेस झाल्याचं देखील म्हटलं आहे.

या मेसेजमध्ये त्याने लिहिलं की, ‘जगातील सर्वांत उंच स्क्रीनवर स्वतःला पाहणं आनंद द्विगुणीत करणारं होतं. माझा मित्र #MohamedAlabbarने माझ्या आगामी सिनेमा अगोदर माझं नाव या सर्वांत मोठ्या स्क्रीनवर लावलं आहे. बुर्ज खलिफा आणि इमार दुबई यांना धन्यवाद आणि खूप सारं प्रेम. माझी मुलं यामुळे प्रचंड इम्प्रेस झाली आहेत आणि मी देखील.’ बॉलिवूड सेलिब्रिटी करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांनी शाहरुख खानचा बुर्ज खलिफासमोर आनंद साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे. याचबरोबर शाहरुखने सोमवारी संध्याकाळी आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्याने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओत त्याने आभार मानताना त्याच्या काही फॅन क्लबचं नाव घेतलं असून त्यांच्या प्रेमाबद्दल त्याने त्यांचे आभार मानले आहेत. याचबरोबर कोरोनाच्या या काळात नागरिकांसाठी सामाजिक मदत आणि कार्य करणाऱ्या चाहत्यांचेदेखील आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here