Home औरंगाबाद औरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार

औरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार

9055
0

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे :

मागील अनेक महिन्यांपासून कोरोना संसर्ग वाढल्याने बंद करण्यात आलेली औरंगाबाद स्मार्ट शहर बस सेवा आता अनलॉक नंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावण्यास सज्ज झाली आहे. उद्यापासून ( दि. 8 जून) शहर बससेवा सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
प्रवाशांनी कोविडच्या सर्व नियमांचा अवलंब करून बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभाग यांच्या कडून करण्यात येत आहे.

पहिल्या टप्यात खालील मार्गांवर बस सेवा

▪ मार्ग क्र. 4
सिडको ते रेल्वे स्टेशन
मार्गे – टीव्ही सेंटर

▪️ मार्ग क्र. 5
औरंगपुरा ते रांजणगाव
मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक

▪️ मार्ग क्र. 10
औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगर
मार्गे – महावीर चौक, 7 हिल

▪️ मार्ग क्र. 12
सिडको ते घाणेगाव
मार्गे – रांजणगाव, मायलन

▪️ मार्ग क्र. 13
सिडको ते जोगेश्वरी
मार्गे – रांजणगाव

वरील 5 मार्गांवर 241 फेऱ्यामार्फत 16 बसेस धावणार आहेत. सर्व बसेस या निर्जंतुक केलेल्या राहतील. तर प्रवासावेळी मास्क, सेनिटायझर वापरणे व शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यातील बस सुरू केल्या जाणार असल्याचे स्मार्ट शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर आणि उप व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here