Home महाराष्ट्र आज चौकशीसाठी हजर…

आज चौकशीसाठी हजर…

266
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी ३० डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं होतं. पण कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.एकनाथ खडसे यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्याने आज एकनाथ खडसे ईडी चौकशी करता हजर राहणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. खडसे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. एकनाथ खडसे मुंबईत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here