Home पुणे शहरप्रमुखासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…!

शहरप्रमुखासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…!

255
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : वाढीव वीजबिल माफ करावे या मागणीसाठी मनसेकडून आज(२६ नोव्हें.)पुण्यातील शनिवारवाडा ते जिह्याधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे येणार असल्याचे लक्षात आल्याने मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे यांना काल सायंकाळी पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली होती. आज सकाळी आंदोलनाच्या वेळी कार्यकर्ते व शिंदे आंदोलनस्थळी पोहोचताच, त्यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले.अजय शिंदे यांच्या सोबतच पोलिसांनी ५०-६० कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतेले आहे. पोलिसांनी शहरप्रमुख आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या नंतर आंदोलनस्थळी मनसेचे नेते बाबू वागसकर, रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसैनिकांसह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here