Home शहरं दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज…!

दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज…!

188
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कृषी कायद्यांचा निषेध करत ‘दिल्ली चलो’ आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांना अंबाला नजिक शंभू सीमेवर रोखण्यात आले.पंजाब – हरियाणाला जोडणाऱ्या अंबालाच्या शंभू सीमेवर ते दाखल झाले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेला शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या सीमा सील करण्यात आल्यात. पंजाबमधून हजारो ट्रॅक्टर – ट्रॉलीमधून अन्न, पाणी, डीझेल आणि औषधं आपल्या सोबतच घेऊन शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत.पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अंबाला – कुरुक्षेत्र राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रागात बॅरिकेडेस् उचलून फ्लायओव्हरच्या खाली फेकून दिले. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here